Nirbhaya Gangrape Case: फाशी अटळ! निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली
Nirbhaya Case Convicts | File Image

दिल्ली 2012 निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gangrape Case) आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता (Pawan Kumar Gupta) याची Curative Plea आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली, त्यानंतर पवनचे वकील ए. पी. सिंह (A. P. Singh) यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्याकडे पवनची दया याचिका पाठवली होती, मात्र आता राष्ट्रपतींनी सुद्धा ही याचिका फेटाळून फाशीला हिरवा कंदील दिला आहे. यानुसार आता उद्या 3  मार्च रोजी सकाळी 6  वाजता पवन सहित अन्य तीन दोषी विनय कुमार (Vinay Kumar) , अक्षय सिंह (Akshay Singh), मुकेश सिंह (Mukesh Singh)  यांना तिहार जेल मध्ये फाशी देण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून निर्भया प्रकरणातील दोषींचा फाशी चुकवण्याचा किंवा निदान लांबणीवर पाडण्यासाठी याचिकांच्या मार्फत प्रयत्न सुरु होता, यामध्ये पवन कुमार याची Curative Plea आणि अक्षय सिंह ची राष्ट्रपतींकडे करण्यात आलेली दया याचिका दाखल करण्यात आली होती. पवनने आपल्या याचिकेत फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती तर अक्षयने मागील वेळेच्या द्या याचिकेत काही मुद्दे शिल्लक राहिल्याचा दावा करत दया याचिका दाखल केली होती. आता मात्र या सर्व दोषींचा याचिका मार्ग बंद झाल्याने उद्याची फाशी अटळ असल्याचे स्पष्ट आहे.

पहा ट्विट

दरम्यान, उद्या सकाळी 6  वाजता तिहार जेल येथे या चौघांनाही फाशी दिली जाईल, यासाठी मागील काही दिवसांपासून तिहार जेल मध्ये तयारी सुरु आहे, खांदानी जल्लाद पवन हे या चौघांना फाशी देतील.

Nirbhaya Rape Case: निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा टळली Watch Video 

तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चारही दोषींना समजणार नाही अश्या पद्धतीने ही फाशीची तयारी करण्यात आली आहे. तसेच आता या दोषींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.