दिल्ली 2012 निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gangrape Case) आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता (Pawan Kumar Gupta) याची Curative Plea आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली आहे, त्यामुळे उद्या, 3 मार्च रोजी या चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या सकाळी 6 वाजता तिहार जेल येथे निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषी पवन कुमार गुप्ता, विनय कुमार (Vinay Kumar) , अक्षय सिंह (Akshay Singh) आणि मुकेश सिंह (Mukesh Singh) यांना फाशी दिली जाणार आहे, तत्पूर्वी फाशी चुकवण्याचा किंवा निदान लांबणीवर पाडण्यासाठी दोषींकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, यामध्ये पवन कुमार याची Curative Plea आणि अक्षय सिंह ची राष्ट्रपतींकडे करण्यात आलेली दया याचिका समाविष्ट आहे, त्यापैकी पवनची याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पवन कुमार याने आपल्या याचिकेत, फाशीची शिक्षा देण्याऐवजी आपल्यालाजन्मठेप देण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र सर्वोकंच न्यायालयाने ही मागणी धुडकावून लावली आहे. दुसरीकडे अक्षय सिंह याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पुन्हा एकदा दया याचिका केली आहे, मागील वेळेस दाखल केलेल्या याचिकेत काही महत्वपूर्व मुद्दे नमूद करायचे राहून गेले असल्याचा अक्षयने दावा केला होता.
ANI ट्विट
2012 Delhi gangrape case: One of the convict Pawan's curative petition has been dismissed by the Supreme Court. The petition had sought commutation of his death penalty to life imprisonment. pic.twitter.com/2KhruqyxVb
— ANI (@ANI) March 2, 2020
दरम्यान, निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात करण्यात आलेल्या दिरंगाई वरून निर्भयाची आई आशा देवी यांच्यासहित सामान्य जनतेतही रोष पाहायला मिळाला होता, सुरुवातील 22 जानेवारी मग 1 फेब्रुवारी आणि आता उद्या 3 मार्च अशी या दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होत, प्रत्येकवेळी फाशीच्या दिवसाच्या काही दिवस आधीच दोषींकडून अशा प्रकारच्या याचिका करून पळ काढण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र आता उद्या त्यांची फाशी अटळ असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.