
कधी कधी नाव अशी काही भन्नाट कामगिरी करुन जाते की त्या मागची भावना बदलून लोक नावाकडेच पाहायला लागतात. आता कोरोना म्हटलं की लोक नाक मुरडणार आणि त्यातच कोरोनाचा नवा तितकाच धोकादायक मानला गेलेला व्हेरीएंट ओमिक्रॉन (Omicron) म्हटले तर? अनेकांच्या छातीत धस्स होईल. पण हेच नाव जर एखाद्या चलनाला दिले तर? उगाच डोक्याला ताण नका देऊ. थेट समजूनच घ्या. मंडळी, ओमिक्रोन (Cryptocurrency Omicron) या कोविड-19 चा व्हेरीएंटचे नाव एका क्रिप्टोकरन्सीला (Cryptocurrency) मिळाले आणि या करन्सीसोबतच त्याच्या ग्राहकाचेही नशी पालटले. होय, ओमिक्रॉन हे नाव धारण करताच त्याच्या खरेदी-विक्रिचे नवनवे उच्चांक प्रस्तापीत होऊ लागले आहेत. होय, ओमिक्रोन क्रिप्टोकरन्सी ने आतापर्यंतच चक्क 900% परतावा दिला आहे. आता बोला.
Omicron हा कोरोनाचा एक व्हेरीएंट असून तो दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. याच व्हेरीएंटच्या नावाने क्रिप्टोकरन्सी काढण्यात आली. कॉईन मार्केट कॅपच्या आकड्यांच्या हिशोबाने 27 नोव्हेंबरला Omicron Cryptocurrency ची किंमत होती 64.94 डॉलर ( भारतीय रुपयांमध्ये 4,865 रुपये) मात्र, 29 नोव्हेंबरला त्याची किंमत झाली चक्क 692.45 डॉलर ( भारतीय रुपयांमध्ये 51,875 रुपये) केवळ दोन ते तीन दिवसात या चलनाने ग्राहकांना तब्बल 900% परतावा दिला आहे.
Omicron हा क्रिप्टोकरन्सी इथेरियम (Ethereum) वर आधारीत क्रिप्टोटोकन आरे. त्याची ट्रेंडींग सुशीस्वॅपच्या माध्यमातून होते. ही एक विकेंद्रीकृत क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज (Cryptocurreny Exchange) आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (World Health Organisation-WHO) ने 26 नोव्हेंबर 2021 ला दक्षिण अफ्रीकेत मिळालेल्या कोविड-19 च्या नव्या व्हेरीएंटचे नाव Omicron ठेवले होते. (हेही वाचा, Cryptocurrency Blockchain Nodes: क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन नोड कसे काम करते? जाणून घ्या नेटवर्कविषयी)
दरम्यान, क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये नुकतीच मोठी घसरण पाहायला मिळाली होती. जागतीक अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग क्रिप्टोकरन्सीने व्यापला आहे. भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत अद्याप ठोस असा कायदा नाही. मात्र, सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरेंसी रेग्युलेशन (Cryptocurrency Regulation) बाबत विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे.