PM Modi, Amit Shah And Rajnath Singh (Photo Credits: PTI and Wikimedia Commons)

आज संपूर्ण भारतात नवरात्रीचा (Navratri) नऊ दिवसांचा उत्सव सुरु झाला आहे. आज सर्वत्र आनंदाचे, चैतन्याचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी जमता येत नसले तरीही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने हा सण साजरा करताना दिसत आहे. या मंगलमयी सणाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी खास ट्विट केले आहे. सर्व जनतेला या दिनाच्या शुभेच्छा देत तुम्हा सर्वांवर देवीची कृपादृष्टी कायम राहो अशी मागणी त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नवरात्रीच्या या पावन पर्वाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जगत जननी माँ जगदंबेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, शांति आणि समृद्धी कायम राहो' असे ट्विटमध्ये म्हटले आहे. Happy Navratri 2020 Wishes in Marathi: घटस्थापनेच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन दणक्यात साजरी करा यंदाची नवरात्र!

तर गृहमंत्री अमित शाह यांनी मां भगवती तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी कायम ठेवो असे म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शारदीय नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

हेदेखील वाचा- Navratri 2020 Songs: नवरात्री उत्सव साजरी करण्यासाठी या गाण्यांनी करा दिवसाची सुरुवात आणि देवी मातेच्या भक्तीत व्हा लीन!

आज देशभरात साधेपणाने का होईना पण प्रत्येक भाविक देवीचा हा नऊ दिवसांचा उत्सव साजरा करत आहे. या सणावर कुठले गालबोट लागू नये म्हणून लोकांनीही सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे