Suresh Prabhu (Photo Credits: ANI)

जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्येही पसरायला सुरूवात झाली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर देशात परदेश प्रवास करून येणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यामध्ये सर्वसामान्यांसह बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांनाही कोरोना चाचणी करून खबरदारीचा उपाय म्हणून भाजपा खासदार सुरेश प्रभू (Suresh Prabhu) 10 मार्च 2020 ला सौदी अरेबिया मध्ये Second Sherpas' Meetin ला गेले होते. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट नकारात्मक आला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सुरेश प्रभू स्वतः 14 दिवस राहत्या घरीच आयसोलेशनमध्ये राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना आपण सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भारतामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 147 पर्यंत पोहचला असून त्यापैकी 3 कोरोना व्हायरस बाधितांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सरकारने 15 एप्रिल पर्यंत नगरिकांना परदेशी दौरे टाळण्याचं आवाहन केले आहे. तर काही आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं टाळत तेथून येणार्‍या नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. पुढील आदेशांपर्यंत हे नियम लागू असतील. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला 'हा' खास सल्ला

सुरेश प्रभू ट्वीट

भाजपाकडूनही कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्नय घेतला आहे. महत्त्वाच्या गोष्टींची माहिती ज्येष्ठ नेत्यांकडून दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.