Narendra Modi (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळा सल्ला दिला आहे. यात त्यांनी जनतेला अनावश्यक प्रवास टाळा, गरज नसल्यास कार्यालयात न जाता 'वर्क फ्रॉम होम' चा (Work From Home) पर्याय निवडा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्या व्यक्तीची काळजी घ्या, आदी सुचना नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर #IndiaFightsCorona हा हँशटॅग वापरून जनतेला कोरोना संदर्भात काही सुचना आणि सल्ला दिला आहे. तसेच भारतात कोरोनाग्रस्त रुग्णाची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेवा कर्मचारी प्रयत्न करत आहेत. त्याच्या या योगदानाची आम्ही कदर करतो, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रात 38 कोरोनाग्रस्त; यवतमाळ मध्ये आढळला नवा रूग्ण ; 16 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

आज देशातील डॉक्टर्स कोणतीही भीती न बाळगता कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. त्यांच्या या योगदानातून राष्ट्रातील एकतेचा प्रत्यय येतो. तसेच अशा परिस्थितीत आपल्या राष्ट्राची भक्कम भावना दिसून येते. कोरोना विषाणू देशात पसरू नये, यासाठी योग्य काळजी घेतली जात आहे. देशातील सर्व डॉक्टर, परिचारिका, विमानतळ कर्मचारी आणि इतर सर्व नागरिक भारतातील COVID-19 चा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढत आहे, असंही मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.