Live
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे कलम 144 लागू; 16 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Mar 16, 2020 11:19 PM IST
जगभरात वाढत चाललेला कोरोना व्हायरसचा विळखा आता अधिकच दहशत पसरवत आहे. यामध्येच इराण मध्ये अडकलेल्या 52 भारतीय विद्यार्थी आणि शिक्षक यांची आज सुटका करण्यात आली आहे. अद्याप इराणमधून सुटका करणार्यांची आता 389 वर पोहचली आहे. दरम्यान आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळेस त्यांनी एम्बेसी मध्ये काम करणार्या अधिकार्यांचे आभार मानले आहे. सध्या चीन पाठोपाठ कोरोना व्हायरसचे सर्वाधिक बळी इराणमध्ये गेले आहेत. धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात भाविक इराण, तेहरानमध्ये पोहचले होते.
महराष्ट्रातही कोरोनाचं सावट अधिक दाट झालं आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. मुंबई, पुणे, नागपूर सह राज्यात 33 रूग्ण आहेत. तर आता कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्रात चित्रपटगृह, नाट्यगृह यांच्यासह शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
मध्य प्रदेशामध्ये आज कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कॉंग्रेसला रामराम ठोकल्यानंतर तेथील विधानसभेतील कमलनाथ सरकार धोक्यात आल्याची चर्चा होती.