MP Ganesamoorthy Passes Away: लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या  Ganesamoorthy यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन
Erode MP & MDMK Leader A Ganeshamoorthy (Photo Credits: X/@Pranjal_Writes)

विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या Ganesamoorthy यांचं आज (28 मार्च) ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 24 मार्च दिवशी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर इरोडच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी पाच वाजून पाच मिनिटाला त्यांच्या छातीत दुखू लागले होते कार्डिअ‍ॅक अरेस्ट मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Ganesamoorthy यांना उपचारासाठी कोईम्बतूरच्या हॉस्पिटल मध्येही दाखल करण्यात आले होते. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. गणेशमुर्थी हे 3 वेळेस खासदार होते. लोकसभा निवडणुकीसाठी MDMK कडून पुन्हा तिकीट न मिळाल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. तर पक्षातील नेत्यांच्या माहितीनुसार, घरगुती वादामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. काही महिन्यांपूर्वी गणेशमूर्थी यांच्या पत्नीचे निधन झाले आणि नंतर त्यांच्या घरामध्ये वाद होते.

पहा ट्वीट

गणेशमुर्थी हे 76 वर्षीय होते. MDMK चे नेते आणि खासदार होते. 2019 ची निवडणूक त्यांनी Erode मधून लढवली होती. त्यांनी यापूर्वी 1998 मध्ये पलानी आणि 2009 मध्ये इरोडमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. गणेशमुर्थी यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. Kumaravalasu या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.