युपी-उत्तरखंड मध्ये विषारी दारुचे थैमान, मृतांचा आकडा 92 वर पोहचला
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

उत्तर प्रदेश (UP) आणि उत्तराखंड (Uttarakhand) मधील विषारी दारुने थैमान घातले असून मृतांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे. सहारनपुर, रुकडी आणि कुशीनगर येथे विषारी दारु प्यायल्याने एकूण 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपुर येथे 64, रुकडी 20 आणि कुशीनगर येथे 8 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर सहारनपुर येथील 18 लोकांचा मृत्यू हा उपाचारादरम्यान मेरठ येथे झाला आहे.

सहारनपुर येथील अधिकाऱ्यांच्या मतानुसार उत्तराखंड येथील एका तेराव्याच्या अंतिमसंस्कारावरुन परत येताना मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. तर आता पर्यंत 46 लोकांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 लोकांचा मृत्यू विषारी दारु प्यायल्यामुळे झाला आहे. तर मेरठ मधील 18 लोक सहारनपुर येथून होते. त्यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. सहारनपुर जिल्ह्यातील नागल, गागलहेडी आणि देवबंद थाना क्षेत्रातील काही गावातील लोक रात्री उशीरा पर्यंत ही विषारी दारु प्यायल्याने 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून अवैध पद्धतीने विकल्या जाणाऱ्या ठिकाणी छापे मारण्यात आले. तसेच पुढील 15 दिवस पोलिसांकडून याबाबच अधिक छापे मारण्यात येणार आहेत.दरम्यान, कुशीनगर येथे विषारी दारु प्यायल्याने सहा लोकांवर मृत्यू ओढावला आहे. अधिकाऱ्यांनी एक्साइज पोलीस, दोन मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस आणि दोन कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे.