खुशखबर! 8 ऑक्टोबरपासून Income Tax विभाग पुर्णपणे होणार ऑनलाईन, करदात्यांची होणार अधिका-यांपासून सुटका
The Income Tax | Representational Image | (Photo Credits: PTI)

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या रोज नवनवीन योजनांची घोषणा होतच आहे. त्यातच आता मोदी सरकारने करदात्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. 8 ऑक्टोबरपासून Income Tax विभाग पुर्णपणे ऑनलाईन होणार आहे. ज्यामुळे करदात्याला कुठल्याही तक्रारीसाठी आयकर विभागाच्या अधिका-याला सामोरे जावे लागणार नाही. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, फेसलेस असेसमेंट (Faceless-Assessment)मुळे टॅक्स अधिकाऱ्यांची दहशत आता वाटणार नाही असा दावा सरकारने केलाय. सरकारचे महसूल सचिव अजय भूषण पांडेय (Ajay Bhushan Pandey) आणि CBDT चे संचालक (Pramod Chandra Modi) यांनी या केंद्राचं आज उद्घाटन केलं.

8 ऑक्टोबर पासून सुरु होणा-या या Faceless-Assessment मुळे लोकांना आता आयकर अधिकाऱ्यांसमोर जावं लागणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि लोकांचा वेळही वाचेल. टॅक्स दहशतवादामुळे सरकारविषयी व्यावसायिकांच्या मनात दहशत निर्माण होते. त्यामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम होतो आणि सरकारची प्रतिमा डागाळते. याविषयी कायम तक्रारी आल्यानंतर सरकारने हे धाडसी पाऊल उचललं आहे. हेदेखील वाचा- यंदाच्या दिवाळीपूर्वी सरकार देणार मोठं गिफ्ट, करात कपात करण्याची शक्यता

टॅक्स संदर्भात जी काही कारवाई करायची आहे ती याच पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे ग्राहकांना अतिशय चांगल्या दर्जाच्या सोईसुविधाही मिळणार आहेत. www.incometaxindiaefiling.gov.in  इथं लॉगिन करून नावं नोंदवावं लागणार आहे. इथे आलेल्या माहितीचं अधिकारी तपासणी करणार असून ती माहिती कुणाची आहे याची माहिती त्यांना कळणार नाही. हेदेखील  वाचा- Income Tax: ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या इन्कम टॅक्स स्लॅबची सुविधा; जाणून घ्या कसा घ्याल लाभ

देशातल्या दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये या सुविधांसाठी आठ विभागीय केंद्रं राहणार आहेत. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे गंभीर आरोप असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठा झटका देण्यात आला आहे.