यंदाच्या दिवाळीपूर्वी सरकार देणार मोठं गिफ्ट, करात कपात करण्याची शक्यता
Indian Money | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

सणासुदीपूर्वीच केंद्र सरकारकडून नागरिकांना आयकर बाबत दिलासा मिळणार आहे. तर लवकरच सरकारकडून करात कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याबाबत विचार करण्यात येत आहे. याबाबत हिंदूस्थान टाइम्स यांच्या एका रिपोर्टमध्ये दोन शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या हवालाअंतर्गत याबाबत सांगण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, शासकीय अधिकारी डायरेक्ट टॅक्स कोड (DTC) अंतर्गत जुने कर नियम सोपे आणि कर दराच्या बाबत सुद्धा विचार करत आहेत. DTC वर संघटित टास्क फोर्सने 19 ऑगस्टला त्यांचा रिपोर्ट सादर केला होता. त्यामुळे सरकारकडून करात कपात करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहे. तर सरकारकडून करात 5 टक्के कपात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर दिवाळीपूर्वी कर कपात बाबत सरकारकडून  निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच 5 ते 10 लाख रुपये वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना करात 10 टक्के कपातचा विचार करत आहे. मात्र आता 20 टक्के कर लावण्यात येतो. त्याचसोबत अतिरिक्त चार्ज हटवून 30 टक्के कपातकरुन 25 टक्के करण्याचा सु्द्धा विचार केला जाणार आहे. मात्र आता वर्षिक वेतन 2.5 लाख असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर भरावा लागत नाही. मात्र 2.5 लाख पेक्षा जास्त ते 5 लाख रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्या व्यक्तींना 5 टक्के कर भरावा लागतो. परंतु फेब्रुवारी 2019 च्या अंतरिम बजेटमध्ये सरकारने 5 लाख वेतन असणाऱ्यांना करात सूट दिली होती.(खुशखबर! दसऱ्याआधी 1 कोटी कर्मचाऱ्यांना मिळू शकते मोठे गिफ्ट; सरकार महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत)

तर जून महिन्यात विकास दर 5 टक्के राहिल्यानंतर सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. त्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्स सामील असून त्यात कपात करण्यात आली आहे. कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांहून 22 टक्के करण्यात आला आहे. तर उत्पादन कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 15 टक्के ठेवण्यात आला आहे.