प्रकाश जावडेकर (Photo Credits-ANI)

Modi Cabinet:  कृषी कायद्याच्या (Farmer Law) संदर्भात शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनादरम्यान, मोदी सरकारने (Modi Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मोदी कॅबिनेटकडून साखरे्च्या निर्यातीवरील सब्सिडीसाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता 5 कोटी उस शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मोदी कॅबिनेटच्या या निर्णयाबद्दल माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, निर्यातीनंतर होणारी कमाई ही सब्सिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.(Farmers Protest Update: नवी दिल्लीत शेतक-यांचे आंदोलन आणखीनच तीव्र, अन्नदात्यांचे  उपोषण)

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुढे असे ही म्हटले की, यंदाच्या वर्षात साखरेचे उत्पादन 310 लाख टन होईल. देशात याचा खप 260 लाख टन आहे. साखरेचे दर कमी झाल्याच्या कारणामुळे शेतकरी आणि उद्योग संकटात आहेत. यावर मात करण्यासाठीच 60 लाख टन साखर निर्यात करण्यासह सब्सिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Ration Card New Rules: तीन महिने अन्नधान्य रेशन दुकानावरून न घेतल्यास रेशन कार्ड रद्द होणार; रिपोर्ट्स)

 Tweet:

प्रकाश जावडेकर यांनी पुढे असे ही म्हटले की, 350 कोटी रुपयांची सब्सिडी, प्रत्यक्ष निर्यातीचे मूल्य 18000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. या व्यतिरिक्त घोषित सब्सिडीचे 5361 कोटी रुपये एका आठवड्याच्या आतमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे.