MHADA Lottery च्या प्रक्रियेमध्ये बदल; अर्ज भरतानाच करावी लागणार कागपत्रांची सारी पूर्तता
Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

सर्वसमान्यांच्या आवाकात स्वतःच्या हक्काची घरं आणून देण्यासाठी म्हाडा कडून विविध मंडळांत ठराविक वर्षांनी सोडत जाहीर केली जाते. मागील काही वर्षात या सोडतीमध्ये दलालांचा सुळसुळाट, त्यांच्या नावे फसवणूक, प्रतिक्षा यादीमध्ये भ्रष्टाचार असे अनेक आरोप झाले. आता हे गैरप्रकार टाळण्यासाठी म्हाडाने काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार प्रतिक्षा यादी बंद होण्यासोबतच सोडतीचा अर्ज करतानाच कागदपत्रांची पूर्तता असे महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत.

लोकसत्ता च्या वृत्तानुसार, आता सोडत 100 पारदर्शक करण्यासाठी अर्जदारांना अर्ज भरतानाच सारीआवश्यक कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागणार आहेत. त्याशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणार्‍यांमधूनच सोडतीमध्ये भाग्यवान विजेत्यांमध्ये असतील. यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे. MHADA Mumbai Lottery 2022: मुंबई म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी ऑक्टोबरमध्ये, लवकरच अधिकृत घोषणा .

प्रतिक्षा यादी कायम असणं किंवा घराचा ताबा मिळवण्यासाठी 15-20 वर्ष लागणं यावरून सोडतीच्या विश्वासार्हतेवर अनेकता प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे आता सोडतीचा अर्ज घेतानाच कागदपत्रही घेतली जाणार असल्याने सोडतीमधील विजेत्यांना थेट पैसे घेऊन देकार पत्र दिले जाईल. नव्या सोडत प्रक्रियेमध्ये टेक्निकल बदल देखील केले जाणार आहेत. आता म्हाडाकडून सॉफ्टवेअर द्वारा लॉटरी काढली जाणार आहे. या सॉफ्टवेअरची चाचणी आयआयटीकडून केली जाणार आहे.

म्हाडा कडून लवकरच गिरणी कामगारांच्या घरांसाठीची सोडत देखील जाहीर केली जाणार आहे.