गेल्या तीन वर्षात म्हाडाने (Mhada) मुंबईतील (Mumbai) घरांसाठी लॉटरी (Lottery) काढलेली नाही. तरी मुंबईत घराचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आता म्हाडा लवकरचं खुशखबर (Good News) घेवून येत आहे. येत्या दिवाळीत (Diwali) म्हाडा मुंबईमध्ये (Mumbai) चार हजार घरांची लॉटरी काढणार आहे. यासंबंधी म्हाडाकडून सध्या कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही म्हाडाकडून या लॉटरी संबंधी तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील पहाडी-गोरेगाव (Pahadi Goregaon), अँटॉप हिल (Atop Hill), विक्रोळी (Vikroli) आणि कोळे-कल्याण (Kalyan) या भागातील घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. तरी मुंबईकरांची म्हाडा घरांच्या सोडतीची प्रतीक्षा लवकरचं संपणार आहे. तरी तु्म्ही मुंबईत घर घेण्याच्या तयारीत असल्यास लवकरच तयारीला लागा.
मुंबईतील घरासाठी काढण्यात येणार असलेल्या लॉटरीत (Lottery) बांधकाम (Construction) सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल, अशी माहिती मुंबई म्हाडाकडून (Mumbai Mhada) देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात घोषणा केली होती.(हे ही वाचा:- Maharashtra Rain: मुंबईसह उपनगरात रात्रभरात दमदार पावसाची हजेरी तर राज्यभरात पावसाचा जोर कमी)
मुंबईतल्या (Mumbai) घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळं या शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांना धूसर वाटतं. पण म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होऊ शकतं. म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर (Anil Diggikar) यांनी दिवाळीत (Diwali) मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली आहे.