कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर असणाऱ्या लॉकडाऊन (Lockdown) काळात शाळा-कॉलेजेस पुन्हा सुरु होणार अशी बातमी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत होती. ज्यात शैक्षणिक संस्था सुरु होणार असा दावा केला जात होता. परंतु, या सर्व निव्वळ अफवा असून त्यासाठी एडिटेड फोटो वापरण्यात आला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. यात गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) सर्व राज्य सरकारला शैक्षणिक संस्था (Educational Institutions) सुरु करण्याची परवानगी दिली आहे, असे म्हटले आहे.
परंतु, गृहमंत्रालयाच्या सर्व प्रवक्तांनी या सर्व अफवांचे खंडन केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नव्या नियमावलीनुसार, शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. देशातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात शैक्षणिक संस्था सुरु करण्यास अनुमती देण्यात आलेली नाही.
ही निव्वळ अफवा असून त्यासाठी न्यूज चॅनलचा एडिटेड स्क्रीनशॉर्ट वापरण्यात आला आहे. यात मीडिया कंपनीचा बनावट लोगो देखील दिसत आहे. यात स्क्रीनशॉर्टवर लिहिले आहे, "गृह मंत्रालयाने सर्व राज्यात शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे." तसंच "सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे," अशी माहिती या व्हायरल होणाऱ्या फोटोच्या टिकरवर दिसत आहे. (Maharashtra Lockdown 4 Guidelines: सार्वजनिक, खासगी वाहने Green And Orange Zones मध्ये सुरु, पाहा Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद)
Fact Check by Home Ministry:
Claim: MHA permits all States to open schools.
Fact: No such decision taken by MHA. All Educational institutions are still prohibited to open, throughout the country.#FakeNewsAlert#COVID19#IndiaFightsCoronavirus pic.twitter.com/mSWfIDWwNs
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) May 26, 2020
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो पूर्णपणे फेक आहे. गृहमंत्रालयाच्या प्रवक्तांनी सांगितले की, "देशातील सर्व शैक्षणिक संस्था पूर्णपणे सुरु करण्यास अद्याप मनाई आहे." कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पूर्वीच देशातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. त्यानंतर टप्पाटप्प्याने लॉकडाऊन पूर्णपणे लावण्यात आला.