Bulandshahr: खुर्चीने मोडले लग्न, उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर येथील घटना
Marriage | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahr) येथे एका आनंदी विवाह सोहळ्याला गालबोट तेव्हा लागले, जेव्हा खुर्चीवरून झालेल्या वादामुळे लग्न (Marriage) अनपेक्षितपणे संपुष्टात आले. भारतीय विवाह परंपरेमध्ये विवाह ही किती गुंतागुंतींची आणि मानापमानाची अशी विचीत्र पद्धत आहे याचे हे एक अनोखे उदाहरण ठरावे. थाटामाटात झालेले लग्न केवळ एका खुर्चीमुळे (Marriage Broken by a Chair) अवघ्या पाच तासात मोडले. दोन संसार तुटले असले तरी या मोडलेल्या लग्नाची गावभरच नव्हे तर आता देशभर चर्चा होऊ लागली आहे. आपणही जाणून घेऊ शकता लग्नात नेमके घडले तरी काय? ज्यामुळे मोडला नवोदीत दाम्पत्याचा संसार.

उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहरमध्ये 27 जानेवारी रोजी विवाहाचे आयोजन करण्यात आले. वधूची पार्टी बुलंदशहरमधील औरंगाबादची होती आणि वराची पार्टी दिल्लीतील सीलमपूरची. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. दोघांचा संसार आनंदाने फुलणार म्हणून दोन्हीकडील कुटुंबांना आनंद झाला. ठरलेल्या वेळी वरात औरंगाबादच्या एका लग्नमंडपात पोहोचली. वऱ्हाडींनी भोजनाचा येथेच्छ आनंद घेतला. खाण्यापिण्याच्या कार्यक्रमानंतर काझींनी वधू-वरांना निकाह केला. आतापर्यंत सर्व काही ठीक होते. यानंतर वधू पक्षातील कोणीतरी वराच्या आजीकडे खुर्ची मागितली. नवऱ्याच्या आजीला काही हा प्रकार आवडला नाही. तिला हे प्रचंड संतापजनक वाटले. तिने राडा सुरु केला. शब्दाने शब्द वाढत गेला आणि वादच सुरु झाला. (हेही वाचा, Love Marriage Vs Arranged Marriage: प्रेमविवाह की अरेंज मॅरेज? अविवाहितांनो तुमचे प्राधान्य कशाला? जाणून घ्या फायदे-तोटे)

गोंधळ आणि वाद इतका झाला की, ज्या काझीने हे लग्न लावले त्याच काझीवर या लग्नाचा काडीमोड करण्याची वेळ आली. कहर म्हणजे वधू पक्षाला याची माहिती मिळताच त्यांनी वऱ्हाडी मंडळींना लग्नघरात कोंडून ठेवले. दरम्यान, लग्नाचा खर्च वधू पक्षाने देण्याच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी एक करार केला आणि घटस्फोटानंतर वऱ्हाडी दिल्लीला परत जाऊ शकले. (हेही वाचा, Husband, Wife and Extramarital Affair: सेक्रेटरीसोबत लफडं, पत्नीला वाऱ्यावर सोडलं; साठीतल्या महिलेला कोर्टाकडून 30 हजार रुपयांची पोटगी मंजूर)

भारतीय विवाह पद्धत ही अनोखी म्हणून ओळखली जाते. पण, भारत हा विविधतेने नटलेला देश असल्यामुळे सहाजिकच या देशामध्ये चाली-रिती आणि परंपराही भिन्न भिन्न असतात. त्यामुळे अनेकदा मानपान, देवानघेवाण यांवरुन तर कधी जेवनातील पदार्थ यांवरुन वेगवेगळे तंटे-बखेडे निर्माण होतात. अशा वेळी कधी कधी टोकाला गेलेली भांडणे मिटवली जातात, मिटतात आणि दोन्ही पक्ष माघार घेऊन दोघांचा संसार सुरु होतो. पण कधी कधी भांडणे इतकी विकोपाला जातात की, नव्याने थाटले जाऊ पाहणारे संसार थाटण्यापूर्वीच उद्ध्वस्त होऊन जातात. ज्याची गावभर चर्चा होते लोकांना चर्चेसाठ एक विषय मिळतो.