सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या आणि मिम्स बनविण्यात तरबेज असणाऱ्या मंडळींसाठी खास ऑफर आहे. विशेष म्हणजे ही ऑफर चक्क भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यासाठी खास 'मीम स्पर्धा' (Marathi Memes Spardha 2022) आयोजित केली आहे. या स्पर्धेंतर्गत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमधून क्रमांक काढले जाणार आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने दिलेल्या विषयावर चांगले मिम्स बनविणाऱ्या विजेत्या स्पर्धकाला छानशी रक्कमही भेट म्हणून दिली जाणार आहे. काय आहे स्पर्धा आणि त्यात कसे व्हायचे सहभागी? याबद्धल सर्व काही जाणून घेण्यासाठी खाली माहिती आपणास उपयोगी ठरु शकेल.
निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटर हँडलवर #सशक्त लोकशाही या टॅगखाली दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आणि मराठी मीम मॉंक्स आयोजित 'मीम स्पर्धा'. बक्षिसाची रक्कम खालील प्रमाणे (हेही वाचा, Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्यास 350 रुपयांचा दंडाचा दावा बोगस, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं स्पष्टीकरण)
- प्रथम पारितोषिक- 5000 रुपये
- द्वितीय पारितोषिक- 3000 रुपये
- तृतीय पारितोषिक- 2000 रुपये
- प्रत्येक स्पर्धाकस उत्तेजनार्थ- 500 रुपये बक्षीस मिळणार आहे.
स्पर्धेचे विषय
- मतदार नोंदणी आणि मतदान जागरुकता
- निवडणुका लोकशाहीचा सोहळा
- लिंगभेदाच्या पलीकडे नेणारी मतदारांची लोकशाही
स्पर्धेचा कालावधी
- पहिला टप्पा- 1 ते 15 नोव्हेंबर
- दुसरा टप्पा- 23 ते 29 नोव्हेंबर
ट्विट
@CEO_Maharashtra आणि @marathimemmonks यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित #सशक्तलोकशाही मीम स्पर्धा
स्पर्धेचा कालावधी:
पहिला ट्प्पा- ९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२
दुसरा टप्पा- २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ pic.twitter.com/PoHvPkSoTs
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) November 10, 2022
निवडणूक आयोगाने अधिक माहिती देताना म्हटले आहे की, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मराठी 'मीम मॉंक्स' हा फेसबूक ग्रूप जॉइन करा. या गटावरच पोस्ट केलेले मीम्स फक्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.