Hemant Soren on Prime Minister Modi: पंतप्रधान मोदी यांची नुसतीच 'मन की बात', थोडे कामाचेही बोलायला हवे होते; झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा घणाघात
Hemant Soren, | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाच्या लाटेला अवघा भारत सामोरा जात आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना व्हायरस नियंत्रणावरुन झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी पहिल्यांदाच जाहीर टीका केली आहे. हेमंत सोरेन यांचे ट्विट आता चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्याला फोन आला परंतू त्यांनी आपलीच 'मन की बात' (Mann Ki Baat) ऐकवली. त्यांनी जर 'काम की बात' (Kaam Ki Baat) केली असती तर बरे झाले असते, असा घणाघात हेमंत सोरेन यांनी केला आहे.

हेमंत सोरेन हे बहुदा कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. हेमंत सोरेन यांचे ट्विट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. देशभरातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही आता हळूहळू पंतप्रधानांवर टीका करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा केली. या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी होत असलेला संवाध लाईव्ह टेलीकास्ट केला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी हे परंपरा आणि संकेतांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. त्यांनतर केजरीवाल यांनी माफीही मागितली होती. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांतच दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पंतप्रधानांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Nitin Gadkari on Corona Pandemic: ​कोरोना महामारी स्थिती हाताळण्याच्या नेतृत्वाबाबत नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया, सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली होती भूमिक)

Hemant Soren tweet

झारखंड राज्याने केंद्र सरकारवर औषंध्ये आणि रेमडेसिवीर इंजेक्शन पुरेषा प्रमाणात मिळाले नाही. तसेच इतरही आवश्यक मदत केंद्राकडून मिळत नसल्याचा आरोप केला आहे. झारखंडचे आरोग्य सचिव अरुण सिंह यांनी म्हटले आहे की, झारखंडला केवळ 2181 रेमडेसिवीर इंजक्शन मिळाले. राज्य सरकार स्वतंत्रपणे बांग्लादेशकडून इंजेक्शन मागवू शकते. परंतू, केंद्र सरकारने अद्याप त्यालाही मान्यता दिली नाही. त्यातच अपुऱ्या लसपुरवठ्यामुळे झारखंडपुढे कोरोनाचे संकट वाढल्याचेही राज्य सरकारचा आरोप आहे.