Nitin Gadkari on Corona Pandemic: ​कोरोना महामारी स्थिती हाताळण्याच्या नेतृत्वाबाबत नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया, सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली होती भूमिक
Nitin Gadkari | (Photo Credits: Twitter)

भारतात असलेली कोरोना महामारी (Corona Epidemic) परिस्थिती पाहता सर्वच काही पंतप्रधान कार्यालयावर (PMO,Subramanian Swamy) अवलंबून ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटामुळे देशात निर्माण झालेली स्थिती हाताळण्यासाठीच्या व्यवस्थापनाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे द्यावे, अशी भूमिका खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी व्यक्त केली होती. स्वामी यांच्या भूमिकेवर नितीन गडकरी यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. ते वर्धा येथे बोलत होते. ''समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत. मी काही उत्कृष्ट काम वैगेरे करत नाही. केवळ सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे, असे गडकरी म्हणाले''.

नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, मी फारच काही उत्कृष्ठ वैगेरे काम करतो असे नाही. समाजामध्ये माझ्यापेक्षाही अधिक चांगले काम करणारे लोक आहे. जे अधिक योगदान देतात. अगदी सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाऊंडर, पोलीस, पॅरामेडीकल आणि सरकारी कर्मचाही हे लोकही जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत असतात. त्यामुळे त्यांचे दायित्व म्हणून काीह कामांमध्ये मी पुढाकार घेत असतो. सध्या कोरोनाचे संकट पाहता काळ अतिशय बिकट आहे. त्यामुळे सर्वांनी जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता मानवतेच्या दृष्टीकोनातून सेवा करायला हवी, असेही गडकरी म्हणाले. (हेही वाचा, Subramanian Swamy On Pmo: पंतप्रधान कार्यालय अकार्यक्षम, कोरोना महामारी हाताळण्याचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे द्या; भाजप खासदाराची मागणी)

 

Subramanian Swamy twitte Image

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये काय म्हटले?

भारत कोरोना व्हायरस संकटातून मार्ग काढतो आहे. भारताने जसा ब्रिटीश आणि इस्लामिक आक्रमकांपासून आपला बचाव केला त्यातून बाहेर पडला त्याच पद्धतीने आताही तो बाहेर पडेल. या संकटाचा सामना करुन आपण टीकू. आपण कोरोना काळात योग्य निर्बंध लावयला हवेत. अन्यथा थेट मुलांवर परिणाम करणारी दुसरी लाट येऊ शकेल. आता आपल्याला पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकट निवारणाची जबाबदारी आता नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावी.