ईशान्येकडील मणिपूर राज्यात अजूनही अशांतता पसरली आहे. आज शनिवारी दुपारी 3.50 वाजता मणिपूरच्या मोहरेहमध्ये अज्ञात बंदूकधारी आणि पोलीस कमांडो यांच्यात जोरदार गोळीबार झाला. सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी आयईडी आणि इतर स्फोटकांचा वापर केला. या हल्ल्यानंतर राज्य सुरक्षा दलांनी हल्लेखोरांनाही प्रत्युत्तर दिले. जोरदार गोळीबारात मणिपूर पोलिस कमांडो जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मोरेहून की लोकेशन पॉइंट (KLP) कडे जात असताना पोलीस कमांडो घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले. तर, “इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चहनोऊ गाव विभाग ओलांडताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला. या हल्लात पोलीस कर्मचारी जखमी झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर 5 आसाम रायफल्स कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत”, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Mohan Bhagwat On Manipur violence: मणिपूर हिंसाचारातील बाह्य घटकांबद्दल चिंता- मोहन भागवत)
एका अधिकाऱ्याने पुष्टी केली, "इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चहनोऊ गाव विभाग ओलांडत असताना एका कमांडोवर हल्ला झाला तेव्हा त्याला जखम झाली." जखमी कमांडोचे नाव 5 आयआरबीचे पोन्खालुंग असे आहे, अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या त्याच्यावर 5 आसाम रायफल्स कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, "तेंगनौपाल जिल्ह्यातील चिकिम वेंग, मोरे वार्ड क्रमांक 9 येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मोरेहच्या कमांडो टीमवर गोळ्या झाडल्या आणि बॉम्ब फेकले. मणिपूर पोलिस कमांडो या भागात नियमित शोध घेत असताना ही घटना घडली."