Gun Shot | Pixabay.com

मणिपूर (Manipur) मध्ये पोस्टिंग असलेल्या एका सीआरपीएफ जवानाने (CRPF Jawan) स्वतः च्या कॅम्प वर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये त्याच्या दोन सहकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. तर यानंतर त्या जवानाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज रात्री 8 ची आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर जवान F-120 Coy CRPF, चा होता. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे आणि हिंसाचाराला कारणीभूत असणारे कोणतेही मूलभूत घटक उघडकीस आणले आहेत. जखमी जवानांना सध्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी आज मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली असून इंफाळमधील कंगल किल्ल्याबाहेर लष्कर तैनात करण्यात आले आहे.