PF Account Balance | (Photo Credits: File Imagre)

तुम्ही सरकारी नोकरीत (Government Job) असावा खाजगी (Private Job) पण पीएफ (PF) हा सर्व कर्मचाऱ्यांनाचं मिळतो. किंबहुना तुमच्या प्रत्येक महिन्याच्या पगारात त्या प्रकारची तरतूद केली असते. तरी दर महिन्याला तुमची ठरावीक पीएफ रक्कम तुमच्या पीएफ अकाउंटला (PF Account) जमा होते. तर तुमच्या पीएफ अकाउंटला एकूण किती रक्कम जमा झाली आहे किंवा दर महिन्यात किती जमा होते यासाठी तुम्ही तुमचं पीएफ अकाउंट चेक करु शकता. तरी असचं पीएफ अकाउंट बॅलेंन्स (PF Account Balance Check) चेक करताना सायबर चोरच्याने कर्मचाऱ्याच्या काउंटवर थेट १ लाख २३ हजारांचा डल्ला मारला आहे. तरी तुम्ही देखील तुमचं पीएफ बॅलेन्स (PF Account Balance)  चेक करत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. पीएफ अकाउंट बॅलेंस चेक करण योग्यचं पण हो ते चुकीच्या पध्दतीने चेक करण अयोग्य. कारण पीएफ अकाउंट बॅलेन्स चुकीच्या पध्दतीने चेक केल्यामुळेचं या कर्मचाऱ्याची फसवणूक झाली आहे.

 

या पीएफ धारक कर्मचाऱ्याने मात्र पीएफ बॅलेन्स चेक (PF Account Balance Check)  करण्यासाठी गुगलवर हेल्पलाईन नंबर (Google Helpline Number) शोधला आणि त्या नंबरवर कॉल (Call) केला. दुर्दैवाने तो नंबर सायबर चोरट्याचा निघाला. त्या चोरट्याने हेल्पलाईन अधिकारी म्हणून संवाद साधला. त्यानंतर चोरट्याने पीएफ धारकास रिमोट अक्सेस अप डाउनलोड (Remote Access App Download) करण्यास सांगितले. त्यानंतर १४ वेगवेगळे पेमेंट करत या चोरट्याने तब्बल १ लाख २३ हजारांचा डल्ला मारला. चोरट्याने जेव्हा थेट पीएफ ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचे तपशील मागितले तेव्हा त्याने संपूर्ण घटना आपल्या मुलाला सांगितल्यानंतर नंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. (हे ही वाचा:- 8th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार; 8 व्या वेतन आयोगासंदर्भात आले 'हे' मोठे अपडेट)

 

तुम्हाला तुमचं पीएफ बॅलेन्स चेक (PF Account Balance) करायच असल्यास कायम ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत तुम्ही तुमचं बॅलेन्स चेक करु शकता. पण कुठल्याही हेल्पलाईन नंबरच्या (Helpline Number) माध्यमातून किंवा लिंकवर क्लिक करत पीएफ बॅन्स चेक करु नये. तरी या प्रकारच्या फसवणूकी पासून सावध राहण्याचा इशारा नेहमीच प्रशासनाकडून देण्यात येतो.