Bengaluru Metro Train News: बेंगळुरूमध्ये खचाखच भरलेल्या नम्मा मेट्रो ट्रेनमध्ये (Namma Metro Train News) एका तरुणाने तरुणीचा छेड काढली. ही घटना 20 नोव्हेंबरच्या सकाळी घडली. सकाळच्या वेळी मेट्रोमध्ये जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत आरोपीने तरुणीला अश्लिल स्पर्श केला. तिचा विनयभंग केला. पीडितेच्या मैत्रीनिने घडलेली घटना आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तसेच, तिने दैनंदिन प्रवासादरम्यान महिलांना भेडसावणाऱ्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. सोशल मीडियावरील पोस्टनुसार आरोपी पीडितेसोबत सदर कृती करत असताना सहप्रवाशांनी कोणताही विरोध केला नाही. ते मूकपणे मेट्रोत चढले आणि त्यांनी आसन धारण केले. पीडिता आरडाओरडा करत होती. मात्र, सहप्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला, असेही तिने म्हटले आहे.
घटनेचा तपशील:
रेडीट या सोशल मीडिया मंचावरुन "प्रोटीनकार्ब्स" नावाच्या यूजर्सने म्हटले आहे की, ही घटना नम्मा मेट्रो स्टेशनवर सकाळी 8:50 च्या सुमारास घडली. मेट्रोला अपवादात्मक गर्दी होती. पीडितेने त्या दिवशी मेट्रोची निवड करण्याचा निर्णय घेतला. मेट्रोमध्ये चडतानाझालेल्या गर्दीच्या परिस्थितीमुळे एका तरुणाने महिलाला पाठिमागून स्पर्श केला. त्याने तिचा पार्श्वभाग अत्यंत लज्जास्पद रित्या कुरवाळले. त्यानंतर पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर लाल शर्ट घातलेला आरोपी पळून गेला. या वेळी सहप्रवासी मात्र, या घटनेबाबत कोणतीही भूमिका घेताना दिसले नाही. त्यांच्या उदासीनतेमुळेच आरोपी पळून गेला. (हेही वाचा, Man Ate Manchurian In Bengaluru Metro: तरुणाने बेंगळुरू मेट्रोमध्ये खाल्लं 'कोबी मंचुरियन'; पुढे काय झालं? तुम्हीचं पहा व्हिडिओ)
सोशल मीडियावर संताप:
Reddit सोशल न्यूज वेबसाइट आणि फोरमवरील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अशा घटनांना तोंड देण्यासाठी जागरूकता वाढवण्याची आणि सामूहिक कृती करण्याची तातडीची गरज ही घटना अधोरेखित करते.
बेंगळुरू मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे अधिकृत प्रतिसाद:
बेंगळुरू मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेबाबत कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या घटनेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची चिंता वाढत आहे.
बेंगळुरू (नम्मा) मेट्रो ही एक शहरी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (MRTS) आहे. ज्यामध्ये 2 लाईन्स आणि 51 स्थानके बेंगळुरू, कर्नाटकची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. बंगळुरू मेट्रो फेज 1 चे बांधकाम एप्रिल 2007 मध्ये सुरू झाले. जे पूर्ण होऊन ही मेट्रो आता प्रवासी सेवेत आहे.