: कॉंग्रेसच्या विविध बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मलिक्कार्जुन खरगे आज कॉंग्रेस अध्यपदाची सुत्रे हातात घेणार
मल्लिकार्जुन खर्गे (Photo Credit: ANI)

मलिक्कार्जुन खरगे(Mallikarjun Kharge) आजपासून कॉंग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) सुत्रे हातात घेणार आहेत. तरी यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधीसह (Rahul Gandhi) कॉंग्रेसचे अनेक बडे नेते हजेरी लावणार आहे. मलिक्कार्जुन खरगे हे तब्बल 24 वर्षांनंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष असणार आहेत जे गांधी घराण्यातील नाहीत. या पदभारासोबतच कॉंग्रेस पुढील अनेक मोठी आव्हाने मलिक्कार्जुन खरगेंना पेलावी लागणार आहे. येणाऱ्या काही महिन्यातचं गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) सारख्या मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Elaction) आहेत. तसेच कॉंग्रेसच्या हातात आता फक्त बोटावर मोजण्या इतक्या राज्यात सत्ता बाकी आहे. म्हणून या निवडणुकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत मोहिम फत्ते करणं हे कॉंग्रेस पूढील मोठं आणि महत्वाचं आव्हान असणार आहे. तरी आज अध्यक्ष पदाची सुत्र हातात घेतल्या नंतर कॉंग्रेस बाबतीत मलिक्कार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) काय मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

कॉंग्रेसला (Congress) पक्ष मजबूत करण्यासाठी काही अमूलाग्र बदल करणं अत्यंत महत्वाचं आहे. तरी मलिक्कार्जुन खरगेंच्या (Mallikarjun Kharge) हाती सूत्र आल्यानंतर ते कॉंग्रेस पक्षासह पक्षाच्या कार्यकारणीत काय बदल करणार याबाबत देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.  2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षाची एकजूट करणं हे खर्गे यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. (हे ही वाचा:- Happy Gujrati New Year Wishes: PM Narendra Modi, Amit Shah यांच्याकडून गुजराती बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा)

 

खर्गे सोनिया गांधींसह (Sonia Gandhi) पक्षाच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. कर्नाटकातील (Karnataka) दलित समाजातील 80 वर्षीय खर्गे यांनी 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी 66 वर्षीय थरुर यांचा पराभव केला होता. पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं आहे.