मुंबई: मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना, उद्या बुधवार, 14 जानेवारी 2026 रोजी शाळांना सुट्टी असणार की नाही, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मकर संक्रांत हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो, मात्र या दिवशी सर्वच शाळांना अधिकृत सुट्टी नसते. काही शाळांनी स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर केली असली, तरी काही शाळांमध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू राहणार आहे.
राज्यातील शाळांच्या सुट्टीची सद्यस्थिती
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कॅलेंडरनुसार, मकर संक्रांत हा सण 'ऐच्छिक' किंवा 'स्थानिक' सुट्ट्यांच्या श्रेणीत येतो. यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा निर्णय वेगळा असू शकतो.
मुंबई आणि ठाणे: मुंबई आणि ठाणे परिसरातील बहुतेक नामांकित खाजगी शाळा आणि कॉन्व्हेंट शाळांनी १४ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, काही शाळांमध्ये मकर संक्रांतीनिमित्त सुट्टी नसेल.
पुणे आणि नाशिक: पुण्यातील अनेक शिक्षण संस्थांनी संक्रांतीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्येही ग्रामीण भागातील काही शाळांना स्थानिक सुट्टी देण्यात आली आहे. काही शाळांमध्ये मकर संक्रांतीनिमित्त सुट्टी नसेल.
15 जानेवारीला मात्र मोठी सुट्टी
महत्त्वाची बाब म्हणजे, 14 जानेवारीला सुट्टीबाबत शाळांनुसार तफावत असली तरी, गुरुवार, 15 जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या (मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह) सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार असल्याने राज्य सरकारने या दिवशी अधिकृत सुट्टी दिली आहे. यामुळे अनेक शाळांनी 14 आणि 15 जानेवारी अशा सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन केले आहे.
पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
आपल्या पाल्याच्या शाळेने अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे की नाही, याची खात्री शाळेच्या डायरीतून किंवा अधिकृत मेसेजद्वारे करा.
मकर संक्रांत हा सूर्याच्या उत्तरायणाचा सण असल्याने खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून याला महत्त्व आहे. शाळांमध्ये या दिवशी विद्यार्थ्यांना भूगोलातील या बदलांची माहिती दिली जाते. मात्र, एकाच वेळी अनेक सण आणि निवडणुका आल्याने यंदा सुट्ट्यांचे वेळापत्रक शाळांनुसार बदलले आहे.