Ramdas Athawale (Photo Credit: ANI)

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर अनिल देशमुख यांच्या वसूली प्रकरणी विरोधकांकडून जोरदार टीका केली गेली. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी महाविकास आघाडीवर निशाणा साधत येत्या दिवसात त्यामधील मंत्री एकापाठोपाठ एक राजीनामा देतील असे त्यांनी म्हटले आहे. ANI सोबत बोलताना आठवले यांनी असे म्हटले आहे की, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप लावला आहे. त्यामुळे देशमुखांच्या चौकशी संदर्भात नोटीस सुद्धा त्यांना धाडण्यात आल्या. मला असे वाटते अशा प्रकारच्या आणखी काही नोटीसा सुद्धा धाडल्या पाहिजे असे आठवले यांनी म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्री सुद्धा एकामागोमाग एक राजीनामा देतील. अखेर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल.

रविवारी CBI कडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन PA ची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांना परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर जे आरोप लावले ते सत्य आहेत का त्याबद्दल विचारण्यात आले. या दोघांना सीबीआयकडून एकाच दिवशी समन्स धाडण्यात आले होते.अनिल देशमुखांनी 5 एप्रिलला आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला होता. तर सचीन वाझे यांना 100 कोटी रुपये प्रत्येक महिन्यात वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी लगावला आहे.(महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा उद्रेक; केंद्र सरकारचे तिन्ही राज्यांना पत्र)

या व्यतिरिक्त राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात आठवले यांनी असे म्हटले की, लॉकडाऊन लावणे गरजेचे आहे कारण गर्दी कमी होईल. त्याचसोबत हे सुद्धा महत्वाचे आहे की याचा फटका मजूरांना बसता कामा नये. महाराष्ट्र सरकारकडून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात नसल्याचे ही आठवले यांनी म्हटले आहे. पुढे असे म्हटले की, आता केंद्र सरकारकडून लसीकरण उत्सव साजरा केला जात आहे.(देशात रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा पडलाय तरीही सुरत मध्ये भाजच्या ऑफिसमध्ये मोफत वाटप, नवाब मलिक यांच्याकडून प्रश्न उपस्थितीत)

ज्योतिबा फुले आणि भिमराव आंबेडकर यांनी न्यायासाठी लढा दिला. त्यांची जयंती लक्षात घेता मी पंतप्रधानांनी लसीकरण उत्सवाचा जो निर्णय घेतला त्यांच्या स्वागतासह अभिनंदन करतो. तसेच बंगाल मधील विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी कुछ बेहार येथे झालेल्या हिंसेत चार जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मृत्यू झालेल्यांना आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.