
राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.आज नवीन 83 रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार, सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 705 वर पोहोचलाय. त्याचबरोबर कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-1च्या रुग्णातही वाढ होत असून ही संख्या 250 वर पोहोचलीय. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मेट्रो शहरात जेएन-1 कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यात आढळून आलीय. (हेही वाचा - Corona JN.1 Variant: 40 हून अधिक देशांमध्ये पसरला नवीन व्हेरियंट, भविष्यातील धोक्याचा अलर्ट असल्याचं तज्ज्ञांचं मत)
आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर नागपूरमध्ये 30, मुंबई -22, सोलापूर 9 अशी संख्या आज आढळलीय. राज्यातील सक्रीय रुग्ण मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 155, ठाणे- 3,ठाणे मनपा-73, नवी मुंबई मनपा-79, कल्याण डोंबिवली मनपा-16 अशी रुग्णांची नोंद ही झाली आहे.
आज राज्यात 12,917 कोविड चाचण्या झाल्या.त्यात आरटी-पीसीआर चाचण्या 2509 आणि आरएटी चाचण्या 10,408 झाल्या असून आज पॉझिटीव्हीटी रेट 0.66 टक्के होता. 1 जानेवारी 2023 पासून ते आतापर्यंत 143 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यापैकी 71.33 टक्के रुग्ण हे 60 वर्षावरील आहेत.