Exam (PC - pixabay)

State Common Entrance Test Cell, Maharashtra कडून MAH LLB CET 2025 साठी रजिस्ट्रेशनच्या तारखेला मुदतवाढ दिली आहे. आता MAH-LLB 5 Yrs. CET- 2025 साठी 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन स्वरूपात करण्यासाठी MAHACET च्या वेबसाईट mahacet.org वर करता येणार आहे.

कसे कराल MAH-LLB 5 Yrs. CET- 2025 साठी रजिस्ट्रेशन ?

  • MAHCET ची अधिकृत वेबसाईट mahacet.org ला भेट द्या.
  • त्यानंतर होम पेज वर रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
  • आता एक नवं पेज ओपन होईल त्यामध्ये रजिस्ट्रेशन साठी आवश्यक डिटेल्स टाका.
  • सबमीट करून लॉगिन करा.
  • अ‍ॅप्लिकेशन चे डिटेल्स टाकल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन फी भरा.
  • आता सबमीट वर क्लिक करून पेज डाऊनलोड करा.

महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी, महाराष्ट्र राज्याबाहेरील (OMS)/सर्व प्रवर्गातील अखिल भारतीय उमेदवार आणि J&K स्थलांतरित उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1000/- आहे आणि इतर उमेदवारांना ₹800/- भरावे लागतील. फी इंटरनेट पेमेंट, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro), इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स/मोबाईल वॉलेटद्वारे ऑनलाइन भरावी लागेल. Maharashtra LLB CET 2025 New Marking Scheme: एलएलबी 3, 5 वर्षाच्या कोर्ससाठी 120 मार्कांची परीक्षा .

MAH-LLB. 5 वर्षाची CET- 2025 महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील निवडक शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षेत पाच विभागांचा एक पेपर असेल.  कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर तर्क, चालू घडामोडीसह सामान्य ज्ञान, तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्क, इंग्रजी आणि गणित विषयाचा समावेश आहे. प्रश्न इंग्रजी आणि मराठीत असतील. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार MAHACET ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.