Arjun Rampal Injured (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Arjun Rampal Injured: अर्जुन रामपाल (Arjun Rampal) रुपेरी पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. अलीकडेच, अभिनेता नेटफ्लिक्सच्या 'नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स 2025' कार्यक्रमात सहभागी झाला होता, जिथे त्याचा अपघात झाला. नेटफ्लिक्सने अलीकडेच एका कार्यक्रमात ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या अनेक चित्रपट आणि मालिकांची घोषणा केली. दरम्यान, अर्जुन रामपालच्या 'राणा नायडू सीझन 2' चा टीझरही रिलीज झाला, ज्यामध्ये राणा दग्गुबती आणि वेंकटेश देखील दिसणार आहेत.

स्टेजवर प्रवेश करताना अर्जुन रामपाल जखमी -

या सिरिजमध्ये अर्जुन रामपाल देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या कार्यक्रमात अर्जुन रामपालने काच फोडून भव्य एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला, पण काचेचे तुकडे अभिनेत्याच्या हातात घुसले. तसेच काच अभिनेत्याच्या डोक्यावर फुटली. स्टेजवर प्रवेश करताना अर्जुन रामपाल जखमी झाला. (वाचा - Arjun Rampal and Girlfriend Gabriella Blessed With Baby Boy: वयाच्या ५० वर्षी अर्जून रामपाल झाला पिता, गर्लफ्रेंड गैब्रिएलाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अर्जुन रामपालच्या व्हिडिओमध्ये त्याच्या हातातून रक्त येत असल्याचे दिसून येत आहे. स्टंट दरम्यान, अभिनेत्याच्या बोटाला काचेचे तुकडे लागले. सिन-ए-मेट्स या युजरने अर्जुन रामपालची ही क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे, जी आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेता त्याच्या राणा नायडू सीझन 2 च्या प्रमोशनसाठी स्टेजवर हाताने पातळ काचेची भिंत तोडून प्रवेश करताना दिसतो. अर्जून रामपाल बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना, काच त्यांच्या डोक्यावर पडते. (हेही वाचा -O Saathi Rey: अर्जुन रामपाल आणि अदिती राव हैदरी पहिल्यांदाच एकत्र दिसणार 'ओ साथी रे' चित्रपटात)

जखमी झाल्यानंतर हसतमुखाने स्टेजवर आला अभिनेता -

अपघातानंतरही अर्जुन रामपालच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली नाही. कारण, येवढा मोठा अपघात होऊनही तो हसत हसत स्टेजवर आला. तथापि, यावेळी त्याच्या बोटातून रक्त येत होते, म्हणून होस्ट मनीष पॉलने अभिनेत्याच्या बोटाकडे लक्ष वेधले.

व्हिडिओवर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया -

अनेक वापरकर्त्यांनी अर्जूनच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, 'रा-वन मोड सक्रिय झाला.' तर एकाने लिहिले आहे, 'अक्षय कुमारसारखीचं एन्ट्री केली.' इतर अनेक वापरकर्त्यांनीही व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी अभिनेत्याच्या हाताला झालेल्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली.