
LLB च्या 3 आणि 5 वर्ष च्या अभ्यासक्रमासाठी सीईटी सेलने मार्किंग सिस्टिमच्या नियमावली (Maharashtra LLB CET 2025 Marking Scheme) मध्ये बदल केले आहेत. यंदा 3 वर्ष LLB ची परीक्षा 20 आणि 21 मार्च दिवशी होणार आहे. तर 5 वर्षाच्या LLB Course साठी 28 एप्रिलला परीक्षा होणार आहे. पूर्वी 150 गुणांसाठी 150 प्रश्नांची उत्तरं दयावी लागत होती पण आता त्यामध्ये बदल झाला असून 120 प्रश्न सोडवण्यासाठी दोन तासांचा वेळ देण्यात येणार आहे.
सीईटी सेलने त्यांच्या दोन्ही कोर्सच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आधी 150 गुणांसाठी 150 प्रश्न सोडवावे लागत होते. आता त्यामध्ये बदल करून 120 गुणांची करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 120 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. पण यासाठी 2 तासांचा वेळ लागणार आहे. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नाही. नक्की वाचा: Fraud Exam: डीवायएसपींनी एलएलबी परीक्षेत स्वतःच्या नावाने बसवला डमी उमेदवार, खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल .
लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, लॉजिकल अँड अनॅलिटिकल रिझनिंग आणि इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न आहेत. पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी बेसिक गणिताचे प्रश्नही विचारले जाणार आहेत.