Shantanu Naidu आता टाटा मोटार्स मध्ये जनरल मॅनेजर आणि Head of Strategic Initiatives झाला आहे. नुकतीच त्याने एक भावनिक पोस्ट लिहित LinkedIn वर आपल्या नव्या बढतीची माहिती दिली आहे. शंतनूने लिहलेल्या पोस्ट मध्ये 'टाटा मोटर्समध्ये General Manager, Head - Strategic Initiatives म्हणून मी नवीन पदावर काम करत आहे हे सांगताना मला आनंद होत आहे! मला आठवते जेव्हा माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पॅन्ट घालून घरी जायचे आणि मी खिडकीत त्यांची वाट पहात असे. आता एक सर्कल पूर्ण झालं आहे'. असं म्हटलं आहे.
शंतनू नायडू ची शैक्षणिक पार्श्वभूमी
शंतनू ने पुण्यात 2014 साली Savitribai Phule Pune University मध्ये इंजिनियरिंगची पदवी घेतली नंतर तो अमेरिकेत Cornell University मध्ये 2016 साली एमबीए झाला. 2018 मध्ये त्याने रतन टाटा यांचा असिस्टंट म्हणून कामाला सुरूवात केली. बिझनेस आयकॉन रतन टाटा यांच्यासोबत त्याची असलेली जवळीक नंतर अनेक ठिकाणी दिसली. रतन टाटांच्या एका बर्थ डे ला तो हॅप्पी बर्थडे गातानाचा व्हिडीओ तुफान वायरल झाला होता. Shantanu Naidu ने 'Goodbye, my dear lighthouse' म्हणत गुरू Ratan Tata यांना अर्पण केली श्रद्धांजली; पहा हा टाटांचा अवघ्या 29 वर्षांचा मॅनेजर कोण?
शंतनू हा ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनियर आहे. त्याने भरधान वेगात येणार्या गाड्यांना रस्त्यावर भिरभिरल्या अवस्थेतील कुत्रे दिसत नसल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेटर कॉलर्स घालण्याची संकल्पना आणली. रतन टाटा आणि शंतनू यांना या प्रोजेक्टने एकत्र आणले. दोघांनाही भटक्या कुत्र्यांचा लळा आहे.
रतन टाटा यांनी Goodfellows,मधील मालकी सोडली, शंतनू नायडू ने 2021 मध्ये भारतात एकटे राहणाऱ्या वृद्धांना मदत करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे. टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात नायडू यांचे शैक्षणिक कर्जही माफ केले. असे रिपोर्ट्स आहेत.