Gujarat Giants WPL 2025: गुजरात जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, 'या' खेळाडूकडे संघाची धुरा
लीगच्या सुरुवातीपासूनच गार्डनर गुजरात संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिने गेल्या दोन हंगामात 324 धावा केल्या आणि 17 विकेट्स घेत चेंडूनेही आपले कौशल्य दाखवले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या गार्डनरला दोन वेळा बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळाला आहे.
WPL 2025: महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या आगामी हंगामासाठी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनर (Ashleign Gardner) हिला गुजरात जायंट्सची (Gujarat Giants) नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तिने देशबांधव बेथ मुनी हिच्या जागी नवीन कर्णधार म्हणून जागा घेतली आहे. लीगच्या सुरुवातीपासूनच गार्डनर गुजरात संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिने गेल्या दोन हंगामात 324 धावा केल्या आणि 17 विकेट्स घेत चेंडूनेही आपले कौशल्य दाखवले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या गार्डनरला दोन वेळा बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळाला आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीने, तिने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांगारू संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकात ती प्लेअर ऑफ द टूर्नामेंट देखील होती.
Gujarat Giants have a new captain for the 2025 WPL season 🆕 pic.twitter.com/jh2yZKhQbp
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 5, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2025 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

