जे आपल्याकडे आहे ते कोणाकडेच नाही आणि आपण जे करतो ते कोणालाच येत नाही, अशा अविर्भावात राहणारा व्यक्ती म्हणजे जादूगार. काही मोजक्याच पण लक्षवेधी कार्यक्रमांनी लोकांना आकर्षित करणारे जादूगार नेहमीच आश्चर्य आणि लोकांच्या चर्चेचा विषय ठरतात. पण कधी कधी लोकांना काही नवीन करुन दाखवण्याच्या नादात जादूगार स्वत:च अडचणीत येतात. पश्चिम बगाल राज्यातील कोलकाता (Kolkata) येथील चंचल लाहिरी (Magician Chanchal Lahiri) नावाचा एक जादूगार असाच अडचणीत आला आहे. लोकांना जादू दाखविण्याच्या नातात कोलकातामधील हुगली नदीत (Hooghly River) बुडून हा ४१ वर्षीय जादूगार बेपत्ता झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार या जादूगाराने स्वत:ला साखळदंडाने बांधलेल्या कुलुपबंध पेटीत बंदिस्त करुन घेतले आणि तो हुगली नदित उतरला. लोकांना वाटले हा जादूचा प्रयोग असल्यामुळे तो आपोआप बाहेर येईल. किंवा इतर ठिकाणाहून बाहेर येईल. परंतू, आठ तास उलटून गेले तरीही तो बाहेर आला नाही. त्यानंतर तो बेपत्ता असल्याची चर्चा सुरु झाली. प्राप्त माहितीनुसार, चंचल लाहिरी हा जादूगार रविवारी (16 जून 2019) दुपारी हुगली नदिच्या पाण्यात उतरला होता.
दरम्यान, पोलिसांना या जादूगाराबाबत माहिती मिळताच घटनेची नोंद घेत त्यांनी तपास सुरु केला आहे. व्यवसायाने जादूगार असलेला जादूगार चंचर हा मूळचा सोनापूर येथील रहिवासी आहे. त्याला जादू या प्रकाराविषयी प्रचंड आकर्षण होते. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला की जादूचे अघोरी प्रकार करण्यास चेव येत असे. लोकांच्या अती प्रोत्साहामुळेच तो नदीत उतरल्याचे सांगितले जात आहे. जादूच्या थरारक प्रयोगांसाठी लागणारी आवश्यक मान्यताही त्याने सरकारकडून प्राप्त केल्याचे लोक सांगतात. (हेही वाचा, मृत व्यक्तीचा आत्मा घेऊन जाण्यासाठी तांत्रिकाकडून रुग्णालयात पूजा)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या महितीनुसार, जादूगार चंचल लाहिरी याने आपल्या अघोरी प्रयोगासाठी रविवारी सकाळपासूनच तयारी केली होती. त्यासाठी त्याने दोन वॉटर वेसेल मागवले होते. हावडा ब्रिज खाली त्याने आपल्या जादूचा प्रयोग करण्याची योजना बनवली होती. एका वॉटर वेसेलवर त्याचे काही सहकारी होते. दुसऱ्या वॉटर वेसेलवर दुसरी टीम होती. जी ही सगळी दृश्य टीपत होती. दरम्यान, ठरल्याप्रमाणे चंचल लाहिरी याने नदीत प्रवेश केला. मात्र, पुढे त्याचा काहीही पत्ता मिळाला नाही. तो बेपत्ता झाला. पोलीस सध्या त्याचा तपास करत आहेत.