Madhya Pradesh: करीना-सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरच्या नावे विचारला गेला प्रश्न, शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला धाडली नोटीस
तैमूर अली खान (Photo Credits: Instagram)

Madhya Pradesh:  मध्य प्रदेशातील खंडवा शाळेतील एका परिक्षेत असा काही प्रश्न विचारला गेला त्यामुळे गोंधळ उडाला. खरंतर प्रश्न अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि पती सैफ अली (Saif Ali Khan) खान यांचा मुलगा तैमूर (Taimur) याच्या नावे विचारला गेला होता. या प्रकारावरुन शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस धाडली आहे.  जनरल नॉलेज मध्ये सध्याच्या घडामोडींसंबंधितच्या सेक्शनमध्ये करीना आणि सैफ अली खान याच्या मुलाचे संपूर्ण नाव विचारले होते. खंडवा जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी संजीव यांचे असे म्हणणे आहे की. शाळेला नोटिस धाडली गेली आहे. त्याचसोबत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. संजीव यांनी असे ही म्हटले की, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ नये.

तैमूरच्या नावे प्रश्न विचारल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच असे ही म्हटले की, तैमूरच्या ऐवजी मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, जिजा बाई, देवी अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भातील प्रश्न विचारले पाहिजेत.(Sachin Tendulkar ची लेक Sara Tendulkar एन्जॉय करतेय गोवा; पहा तिचे मोहक फोटोज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

याआधी सुद्धा तैमूरच्या नावे खुप गोष्टी घडल्या आहेत. जेव्हा करीना आणि सैफ यांनी मुलाच्या नावाची घोषणा केली तेव्हा सुद्धा तिला ट्रोल केले गेले. तर करीना हिचा दुसरा मुलगा जहागीर याला जेह अशा नावाने हाक मारली जाते.