Chhindwara-Nagpur Highway protest | Photo Creditts: ANI

मध्य प्रदेशातील छिंदवाडा (Chhindwara)  भागामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी काही धार्मिक संघटनांसोबतच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी छिंदवाडा-नागपुर हायवे रोखून आपला निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान जाही हिंदू संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोहगावात बसण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यामध्ये होत असलेली दिरंगाई पाहता काही संघटनांनी स्वतःहून मोहगावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला मात्र त्यासाठी नगरपालिकेची परवानगी नसल्याने प्रशासनाने कारवाई करत हा पुतळा हटवला आहे.

दरम्यान मध्य प्रदेशात या प्रकारानंतर काही काळ तणावाचं वातावरण होतं. सोबतच छिंदवाडा-नागपूर महामार्ग रोखल्याने काही काही वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र काही तासातच वाहतूक पूर्ववत करण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आहे. नगरपालिकेने मंगळवार (11 फेब्रुवारी) दिवशी बैठक घेऊन शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करून मोहगावात एका तिठ्याला छत्रपती शिवाजी चौक असं नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान प्रशासनाने वाहतूक पूर्ववत केली असली तरीही काही काळ दुकानं आणि स्थानिक वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

ANI Tweet

दरम्यान मध्य प्रदेशातील बिघडलेली परिस्थिती पाहता नगरपालिकेने सांमजस्याची भूमिका घेतली आहे. लवकरच शिवाजी महाराजांचा पुतळा पालिका प्रशासनाकडून बसवण्याचं काम पूर्ण केले जाईल अशी ग्वाही देखील दिली आहे. दरम्यान महाराजांचा पुतळा हा नियमांनुसार बसवला जावा असं सांगात पालिका पूर्ण सहकार्य करेल असे देखील म्हटले आहे.