Ludhiana Court Blast: लुधियाना कोर्ट परीसरात स्फोट; दोघांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
Ludhiana Court Blast | (Photo Credit: ANI)

पंजाब (Punjab) राज्यातील लुधियाना (Ludhiana Court Blast) येथे गुरुवारी जिल्हा न्यायालय (Ludhiana Court) इमारत परिसरात झालेल्या शक्तीशाली स्फोटात (Ludhiana District Court Complex) दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. स्फोटात इतरही चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यामुळे हा स्फोट (Ludhiana Court Blast) आहे की घातपात याबाबतही स्पष्टता नाही. प्राप्त माहितीनुसार, हा स्फोट लुधियाना कोर्टाच्या (Ludhiana District Court Complex Blast) स्वच्छतागृहात झाला. या घटनेनंतर कोर्ट परिसरात मोठी धावपळ उडाली आणि घबराटही पसरली. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात दुपारी साधारण 12.22 वाजणेच्या सुमारास ही घटना घढली. स्फोट इतका भयावह होता की, या स्फोटामुळे स्वच्छतागृहाच्या खिडक्यांची तावदाने फुटली, भींतींनाही तडे गेले. तसेच, आजूबाजूच्या दालनांच्या भींतींनाही तडे गेले. लुधियानाच्या जिल्हा न्यायालयात झालेल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी म्हटले की, 'मी लुधीयानाला निघालो आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. काही देशविरोधी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करु शकतात. सरकार सावध आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणीही सुटणार नाही.' (हेही वाचा, Golden Temple: सुवर्ण मंदिरात अपमान करण्याचा कथीत प्रयत्न, तरुणाची हत्या)

ट्विट

ट्विट

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्फोटाबाबत दु:ख व्यक्त करत म्हटले की, पंजाब पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करायला हवी. अमरिंदर सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लुधियाना कोर्ट परिसरात स्फोट घडल्याचे वृत्त मिळते आहे. यात 2 जणांचा मृत्यू झाल्याचे ऐकून वाईट वाटले. जखमींना योग्य उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. पंजाब पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावाट''.