Golden Temple: सुवर्ण मंदिरात अपमान करण्याचा कथीत प्रयत्न, तरुणाची हत्या
Golden Temple | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Golden Temple alleged Sacrilege Attempt: पंजाबच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिर येथे गुरु ग्रंथ सहिबाचा (Guru Granth Sahib) अपमान करण्याचा कथीत प्रयत्न केल्याच्या कारणावरुन एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला. अमृतसर (AMRITSAR) मध्ये एका अज्ञात व्यक्तीने रेलिंग वाकवून सूवर्ण मंदिरात आत जाण्याचा प्रयत्न केला. ही घटान तेव्हा घडली जेव्हा पाठ सुरु होता. या व्यक्तीने ग्रंथ साहिब (Guru Granth Sahib) यांच्या समोर ठेवलेली तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसजीपीसी सेवादारांनी या तरुणाला तातडीने पकडले. तसेच, पोलिसांनाही माहिती दिली.

शिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटीच्या सदस्यांनी म्हटले आहे की, या युवकाने अत्यंत बेजबाबदार आणि अपमानास्पद वर्तन करण्याचा प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मारहाण झालेल्या युवकाला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. पोलीस नेमकी घटना घडली कशी आणि या वेळी काय घडले या सर्व बाबींचा तपास करत आहेत. पोलिसांनीही अशी घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमृतसरचे डेप्युटी कमिश्नर परमिंदर सिंह भंडल यांनी म्हटले की, सायंकाळच्या वेळी प्रार्थनेदरम्यान एका व्यक्तीने रेलींग फाकवले आणि पवित्र स्थानाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी संगत प्रार्थनेत व्यग्र होती. लोक आपली मान झुकवून बसले होते. (हेही वाचा, अमृतसरमधील निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तिघांचा मृत्यू, दहाजण जखमी)

डेप्युटी कमिश्नर परमिंदर सिंह भंडल यांनी म्हटले की, आरोपी युवकाचे वय 20 ते 25 वर्षांचे असल्याचे सांगितले जात आहे. त्याने हे कृत्य केले तेव्हा आपले डोके पिवळ्या कपड्याने बांधले होते. तो पवित्र ठिकाणी निघाला होता. मात्र, आरोपी सेवादारांनी त्याला पकडले आणि बाजूला केले. या वेळी या युवकाला मारहाण झाली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी एकटाच होता. सीसीसीटीव्हीचे फुटेल पोलिसांना मिळाले असून, प्रकरणाची विस्तृत चौकशी सुरु आहे. आरोपीच्या मृत शरीराचे शवविच्छेदन केले जाईल. आरोपी नेमका कुठला आहे. त्याने हे कृत्य का केले याबाबत पोलीस तपास करत आहे.