Gas Cylinder Price: पेट्रोल-डिझेलच नव्हे तर आता एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे. घरगुती सिलेंडरच्या किमती आज (1 सप्टेंबर) जाहीर झाल्या. एलपीजी सिलेंडर दरात आज 25 रुपयांची वाढ करण्यात आली. पाठिमागील 15 दिवसांमध्ये एलपीजी दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये 14.2 किलोग्राम वजनाचा एक सिलिंडर प्रत्येक शहरात 800 रुपयांपेक्षा अधिक दरांनी खरेदी करावा लागणार आहे. जाणून घ्या भारतातील प्रमुख शहरांमधील एलपीजी सिलेंडर दर. दरम्यान, केवळ घरगुती गॅसच (Domestic Gas) नव्हे तर त्यासोबत 19 किलो वजनाचाकमर्शियल गॅस (Commercial Gas) सिलिंडरही महाग होताना दिसत आहे.
देशभरातील प्रमुख शहरांतील सिलिंडर दर
देशभरातील सिलिंडरचे दर 14.2 किलोच्या प्रति सिलिंडर टाकीनुसार आहेत. हे दर खालील प्रमाणे
दिल्ली: 884.5 रुपये
मुंबई: 884.5 रुपये
कोलकाता: 911 रुपये
चेन्नई: 900.5 रुपये
दरम्यान, या आधी सिलेंडर किमती अनुक्रमे 859.5 रुपये, 886 रुपये और 875 रुपये दरांनी विकले जात होते. केवळ घरगुती गॅसच नव्हे तर त्यासोबत 19 किलो वजनाचा कमर्शिल गॅस सिलिंडरही महाग होताना दिसत आहे. दिल्लीत कमर्शिअल सिलेंडर1618 रुपयांना विकला जात होते. आता हेच सिलिंडर 1693 रुपयांना विकले जात आहेत. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेल दरामध्ये ग्राहकांना दिलासा, पाहा आजचे दर)
जानेवारी 2021 मध्ये सिलिंडर दर तब्बल 190 रुपयांनी महागला आहे. ही दरवाढ केवळ पाठिमागील आठ महिन्यांमधील आहे. इंधन कंपन्या प्रत्येक महिन्याला एलपीजी सिलिंडर दराचा आढवा घेतात. हा आढावा प्राप्त होताच प्रतिमहिना इंधन दर वाढवायचे की कमी करायचे याबाबत निर्णय घेतले जातात. यात प्रत्येक राज्याची कररचना वेगवेगळी असते. त्यामळे प्रत्येक राज्यात एलपीजी सिलिंडर, पेट्रोल, डिझेल दरांमध्ये काहीशी तफावत जाणवू शकते. दरम्यान, प्राप्त स्थितीत केंद्र सरकार ग्राहकांना एका वर्षात 12 गॅस सिलिंडर पुरवते. ज्यावर केंद्र सरकारकडूनच अनुदानही दिले जाते. जर एखादा ग्राहक निश्चित संख्येपेक्षा अधिक सिलिंडर खरेदी करत असेल तर त्याला बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावे लागते.