LPG Cylinder घेताना वितरक निवडण्याची ग्राहकांना मुभा; या '5' शहरांत सुरु होणार सुविधा
Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

सर्वसामान्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. आता एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) वितरक तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे निवडू शकता, असे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने (Ministry of Petroleum & Natural Gas) आज जाहीर केले. ग्राहक त्यांच्या घराजवळील सर्व डिलिव्हरी डिस्ट्रिब्युटरची (Distributors) यादी पाहू शकतात आणि त्यामधून आपल्या सोयीनुसार डिस्ट्रिब्युटर निवडू शकतात. रजिस्ट्रर असलेल्या ऑईल मार्केटिंग कंपनीमधील डिस्ट्रिब्युटरची यादीच ग्राहकांना दिसेल. ही योजना लवकरच भारतातील पाच शहरांमध्ये सुरु होणार असून यामध्ये चंदीगढ (Chandigarh), कोयंबटूर (Coimbatore), गुडगाव (Gurgaon), पुणे (Pune) आणि रांची (Ranchi) यांचा त्यात समावेश आहे.

सध्या ग्राहक एलपीजी सिलेंडर मोबाईल अॅपद्वारे किंवा लॉग इन डिटेल्स वापरुन कस्टमर पोर्टलद्वारे बुक करु शकतात. सिलेंडर बुक करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराजवळील सर्व डिस्ट्रिब्युटर्सची यादी आणि त्यांचे परफॉर्मन्स रेटिंग दिसेल. ग्राहक त्या यादीमधील कोणत्याही वितरकाकडून एलपीजी रिफिल करु शकतात. या योजनेमुळे ग्राहकांना आपल्या सोयीनुसार वितरक निवडा येईल. त्याचबरोबर आपले परफॉर्मन्स रेटिंग चांगले राहण्यासाठी वितरकांकडून सुद्धा चांगली सेवा देण्यात येईल.

ANI Tweet:

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व ऑईल मार्केटिंग कंपन्या आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. मोबाईल अॅप आणि कस्टमर पोर्टल्स अशा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करुन तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक करुन पेमेंटही ऑनलाईन करु शकता. (Book LPG cylinders through WhatsApp: HP, Indane, Bharat Gas ग्राहक जाणून घ्या गॅस बुकिंगचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि प्रक्रिया)

कोविड-19 च्या काळात कॉन्टॅटलेस ट्रान्जॅक्शनसाठी हे डिजिटल प्लॅटफॉर्म खूप उपयुक्त ठरले आहेत. ऑईल वितरण कंपनीच्या अॅप व्यतिरिक्त उमंग, भारत बिल पे, अॅमेझॉन आणि पेटीएम यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करुनही तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक करु शकता.