Book LPG cylinders through WhatsApp: HP, Indane, Bharat Gas ग्राहक जाणून घ्या गॅस बुकिंगचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि प्रक्रिया
Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

ग्राहकांच्या मदतीसाठी गॅस एजंसी कडून अनेक सुविधा या ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये अजून एक वाढ करून व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) च्या माध्यमातूनही गॅस सिलेंडर बूक करण्याची सोय देण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आता WhatsApp द्वारा देखील आता तुमचा गॅस सिलेंडर घरबसल्या सहज बूक केला जाऊ शकतो. यापूर्वी एलपीजी गॅस सिलेंडरच्या एजंसी किंवा डिस्ट्रिब्युटर किंवा ऑनलाईन बुकिंग द्वारा, वेबसाईटद्वारा बुकिंग करण्याची सोय आहे. पण आता त्याच्या जोडीला व्हॉट्सअ‍ॅप नंबर देखील देण्यात आला आहे. नक्की वाचा: LPG Gas Cylinder Cashback Offer: घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळू शकतो 50 रूपये कॅशबॅक; जाणून घ्या Amazon Pay Offer!

इंडेन गॅस सिलेंडर धारकांसाठी

जर तुम्ही इंडेन कस्टमर असाल तर LPG cylinder बूक करण्यासाठी 7718955555 नंबर वर कॉल करू शकता. WhatsApp Messenger वर REFILL असा मेसेज 7588888824 वर पाठवल्यास तुमचा सिलेंडर बूक होऊ शकतो. मात्र हा मेसेज तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून पाठवणं आवश्यक आहे.

HP Gas सिलेंडर ग्राहकांसाठी

HP Gas सिलेंडर तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅपवर बूक करायचा असेल तर 9222201122 वर मेसेज पाठवा. याकरिता BOOK असा मेसेज करायचा आहे. तुम्हांला त्यानंतर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याची उत्तरं दया. तुमचा सिलेंडर बूक होईल. LPG quota, LPG ID, LPG subsidy सारख्या अन्य काही सेवांची देखील तिथे माहिती मिळू शकते.  नक्की वाचा: LPG Subsidy Status Online: गॅस सिलेंडर ची सबसिडी किती मिळणार हे कसे पहाल?

भारत गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी

भारत गॅस सिलेंडरचे ग्राहक 1800224344 वर मेसेज पाठवू शकतात. BOOK किंवा 1 हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केल्यानंतर तुमचा सिलेंडर बूक केला जातो.

सध्या कोरोना वायरस लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पेटीएम, अमेझॉन पे यांच्या माध्यामातून पैसे भरल्यास काही कॅश बॅक ऑफर देखील दिल्या जात होत्या.