LPG Subsidy Status Online: गॅस सिलेंडर ची सबसिडी किती मिळणार हे कसे पहाल?
Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये विविध राज्यांत एलपीजी गॅस सबसिडी ( LPG Subsidy)ही वेगवेगळ्या स्वरूपात दिली जातात. सामान्यपणे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख पेक्षा जास्त आहे त्यांना ही सबसिडी दिली जात नाही. मग आता दिवसागणिक वाढते इंधनाचे दर गॅस दरवाढीसही कारणीभूत आहे. मागील महिन्याभराच्या काळात दोनदा गॅसदर वाढ झाली आहे. मग तुम्हांलाही सबसिडीची आशा असेल तर पहा घरात बसून तुम्ही या सबसिडीचं गणित कसं करू शकाल?

इंडेन गॅसचे स्टेटस कसे पहाल?

इंडेन गॅसचं स्टेटस पाहण्यासाठी त्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

स्क्रीनवर सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा त्यानंतर कंप्लेंट बॉक्स दिसेल. त्यामध्ये Subsidy Status लिहून proceed वर क्लिक करा.

Subsidy Related (PAHAL) यावर क्लिक करा.

Sub Category काही नवीन पर्याय दिसतील. त्याठिकाणी Subsidy Not Received वर क्लिक करा.

तुमचा मोबाइल क्रमांक एंटर करा.

मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर आयडीचा एक पर्याय आहे. त्याठिकामी तुम्हाला गॅस कनेक्शन आयडी द्यावा लागेल

यानंतर व्हेरिफाय करून सबमिट करा.

(नक्की वाचा: LPG Gas Cylinder: विना अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आता किती पैसे मोजावे लागणार).

तुम्ही ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबसिडीची माहिती तुमच्या स्क्रिनवर दिसणार आहे. त्यामध्ये तुमची सबसिडी किती, किती मिळणार आहे याचे डिटेल्स दिलेले असतील. दरम्यान तुम्ही कस्टमर केअर नंबर वर संपर्क साधूनही माहिती मिळवू शकता. त्यासाठी 1800-233-3555 वर संपर्क साधा आणि तुमचा कस्टमर केअर आयडी सांगून त्याची माहिती घेऊ शकता.