LPG Gas Cylinder: विना अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आता किती पैसे मोजावे लागणार
Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

LPG Gas Cylinder: अलिकडच्या काही महिन्यांत महागाई वाढल्याचं चित्र दिसत आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या किंमती वाढवल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, आज, 4 फेब्रुवारीपासून ग्राहकांना 14 किलो विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. यावेळी प्रति सिलिंडर 25 रुपये वाढवण्यात आले आहे. ग्राहकांना दिल्लीत 719 रुपये प्रति सिलिंडर, कोलकातामध्ये 745.50 रुपये प्रति सिलिंडर, मुंबईत 710 आणि चेन्नईमध्ये 735 रुपये प्रति सिलिंडर भरावे लागतील.

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतीत बदल होत आहेत. यावेळी 1 फेब्रुवारी रोजी व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ करण्यात आली होती. परंतु घरगुती गॅसच्या किंमतीत बदल करण्यात आले नव्हते. मात्र, आज त्याची किंमतही प्रति सिलिंडरमागे सहा रुपयांनी खाली आली आहे. (YONO Super Saving Days: SBI ग्राहकांना योनोद्वारे पेमेंट केल्यास मिळेल 50 टक्के सूट; जाणून घ्या कोणासाठी आहे ही खास ऑफर)

19 किलो Commercial Gas सिलिंडरची नवीन किंमत -

दिल्ली - 1533.00

कोलकाता - 1598.50

मुंबई - 1482.50

चेन्नई - 1649.00

1 फेब्रुवारीरोजी बदल झाल्यानंतर किंमत काय होती -

दिल्ली 1539.00

कोलकाता 1604.00

मुंबई 1488.00

चेन्नई 1654.50

14 किलो सिलिंडरच्या जुन्या किंमती - (1 जानेवारी 2021)

दिल्ली 694.00

कोलकाता 720.50

मुंबई 694.00

चेन्नई 710.00

दरम्यान, कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतीमध्ये बदल करतात आणि त्यांची माहिती सार्वजनिक करतात. परंतु, या वेळेस तसे घडलेले नाही. कारण यावेळी केवळ 19 किलो सिलिंडरची किंमत बदलली आणि 14 किलोची किंमत कायम राहिली.