YONO Super Saving Days: SBI ग्राहकांना योनोद्वारे पेमेंट केल्यास मिळेल 50 टक्के सूट; जाणून घ्या कोणासाठी आहे ही खास ऑफर
YONO (PC - SBI)

YONO Super Saving Days: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांना 'योनो सुपर सेव्हिंग डेज' ऑफर देत आहे. या ऑफरअंतर्गत प्रवाशांना ऑनलाईन शॉपिंगच्या वेळी पेमेंटवर सूट देण्यात येत आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान बँकेच्या मोबाइल बँकिंग अ‍ॅप्लिकेशन योनोकडून पेमेंटवर सूट मिळेल.

ग्राहकांना योनोद्वारे हॉटेल बुकिंगवर 50% पर्यंत सूट दिली जाईल. ओयो रूम बुकिंगवर ही सवलत उपलब्ध आहे. यात्रा डॉट कॉम सह फ्लाइट बुकिंगवर 10% सवलत दिली जात आहे. अॅमेझॉनवरील खरेदीवर 20% कॅशबॅक देण्यात येत आहे. परंतु, ही ऑफर वेगवेगळ्या उत्पादनानुसार बदलू शकते. (वाचा - BSNL ने लाँच केली Cinema Plus Service; 129 रुपयांमध्ये मिळेल Zee5 आणि SonyLIV चा Free Access)

उदाहरणार्थ, टॅब्लेट, घड्याळे आणि सॅमसंग मोबाईलवर आणि इतर काही सामानांवर 15% आणि 20% सूट मिळेल. पेपरफ्रायकडून फर्निचर खरेदी करण्यास 7% अतिरिक्त सूट मिळेल. याचा थेट फायदा एसबीआय योनोच्या 34.5 दशलक्ष वापरकर्त्यांना होणार आहे.

योनो म्हणजे 'You Only Need One App' म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचा एकात्मिक बँकिंग प्लॅटफॉर्म. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी स्विफ्टतर्फे आयोजित योनो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दररोज 4 हजाराहून अधिक वैयक्तिक कर्जाचे वाटप केले आहे. या व्यतिरिक्त, योनो व्यासपीठावरून दररोज सरासरी सुमारे 16 हजार योनो कृषि एग्री गोल्ड कर्जे दिली जातात.