देशात नवं सरकार स्थापन होऊन 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे. आज संसदीय अधिवेशनाचा पाचवा दिवस असून भाजपा नेते आणि माजी मंत्री अनुराग ठाकूर लोकसभेतील चर्चेला सुरुवात केली. देशभरात नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणाने खळबळ उडाली आहे. विद्यार्थी, पालकांसह विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. लोकसभेच्या संसदीय अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट परीक्षा घोटाळ्या संदर्भात उत्तर द्यावं, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली. ज्यानंतर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

पाहा पोस्ट -

विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, NEET पेपर लीक प्रकरणावर सभागृहात चर्चा व्हायला हवी. सरकारने जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत आणि यावरील उपाययोजना सांगायला हव्यात. सभागृहातील चर्चेतून देशभरातील विद्यार्थ्यांना संयुक्त संदेश जायला हवा की विरोधक आणि सरकार या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहे. राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, प्रत्येक मुद्द्यावर सर्वांना बोलण्याची संधी मिळेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तवावर सर्वजण चर्चा करू शकतात. त्याचबरोबर मी सरकारला सांगेन की त्यांनी तुमच्या मुद्द्यावर उत्त द्यावं.