कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशात चिंतेचे वातावरण आहे, दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉक डाऊन (Lockdown) जारी करण्यात आले आहे, यात काही महत्वाच्या बाबीत नियम शिथिल करून उद्योग, व्यवसाय व सरकारी कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. यानुसार लोकसभेच्या सचिवालयात (Losabha Secretariat) सुद्धा मंत्र्यांच्या कामाला सुरुवात झालीहाती , पण याला काही दिवसही न लोटाताच आताएक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेच्या सचिवालयात सफाई आणि अन्य काही करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या व्यक्तीचा कोणाशी संपर्क आला आहे का याबाबत तपासणी करून संबंधित व्यक्तींना सुद्धा क्वारंटाईन मध्ये ठेवले जाऊ शकते. दिल्ली: COVID-19 बाधित पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले 16 लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
आज, दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका कर्मचाऱ्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कर्मचाऱ्यामुळे राष्ट्रपती भवनातील 125 कुटुंबांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
PTI ट्विट
Housekeeper employed with Lok Sabha Secretariat found COVID-19 positive; hospitalised: Sources
— Press Trust of India (@PTI_News) April 21, 2020
दरम्यान, मागील 24 तासात भारतात कोरोनाच्या 1336 नवीन रुग्ण आणि 47 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 18,601 वर पोहचला आहे.कोरोनाचा सर्वात मोठा प्रभाव हा महाराष्ट्र व दिल्ली मध्ये पाहायला मिळत आहे.