राष्ट्रपती भवनातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संंपर्कात; 125 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे विलगीकरण
File image of Rashtrapati Bhavan | (Photo Credits: ANI)

दिल्ली (Delhi) येथील राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्याला व त्यासहित राष्ट्रपती भवनात निवासी अन्य 125 कुटुंबांना स्वतःला विलगीकरणात ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. यावृत्ताची IANS तर्फे पुष्टी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनात राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला, यावेळी त्याच्या अंत्यविधीसाठी आलेल्या अन्य नातेवाइकांमधील एकाला कोरोनाची लागण झाली होती,संबधित कर्मचारी हा राष्ट्रपती भवनात परतल्यावर अन्यही लोकांच्या संपर्कात आला असू शकतो त्यामुळे खबरदारीसाठी अन्य कर्मचाऱ्यांच्या 125 कुटुंबांना विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे

दुसरीकडे, अंत्यविधीला उपस्थित सर्वांना सुद्धा विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. या सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आदेश काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. Coronavirus: दिल्लीत एकाच कुटुंबातील तब्बल 31 जण कोरोनाबाधित, परिसरात खळबळ

ANI ट्विट

दिल्ली मध्ये सध्या कोरोनाची 2,081 प्रकरणे असून त्यातील 78 जणांचा मृत्यू झाला आहे. पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 3  मे पर्यंत कडक लॉक डाऊन ठेवणार असल्याचे सांगितले आहे. देशातील काही ठिकाणी 20 एप्रिल पासून उद्योग व्यवसायांना जरी सूट देण्यात आली असली तरी दिल्लीत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे.

दरम्यान, मागील 24 तासात भारतात कोरोनाच्या 1336 नवीन रुग्ण आणि 47 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 18,601 वर पोहचला आहे. यामध्ये 14759 सक्रिय रुग्ण 3252 बरे झालेले रुग्ण आणि 590 मृतांचा समावेश आहे.