राजकीय भविष्यवाणी: शरद पवार म्हणतात, २०१९ मध्ये पंतप्रधानासाठी तीन लोक ठरतील प्रभावी, राहुल गांधी शर्यतीत नाहीत
Sharad Pawar | (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)अध्यक्ष आणि भारतीय राजकारणातील जाणकार नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी पंतप्रधान कोण याबाबत भविष्यवाणी केली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीस स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या नेतृत्वाखालील NDA ला केंद्रात बहुमत मिळण्यास अपयश आले तर, पंतप्रधान पदासाठी इतर चेहरे दावेदार ठरु शकतात. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) हे तिघेजण अधिक प्रबळ दावेदार ठरु शकतील अशी भविष्यवाणी शरद पवार यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, आपला दावा पक्का करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण दिले. पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी पाहूनच जनतेने 2019 मध्ये NDA ला बहुमत दिले. 2019 मध्येही असेच काहीसे घडू शकते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना मुख्यमंत्री पदाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे हे तिघेही पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरु शकतात, असे पवार म्हणाले. (हेही वाचा,   लोकसभा निवडणूक 2019: 56 मार्क्सची प्रश्नपत्रिका लॉन्च करत भाजपवर मनसे 'पेपर स्ट्राईक')

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरु शकतील याचा अर्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार नाहीत, असे नाही. त्यांच्या तुलनेत मायावती, ममता आणि नायडू यांनी अधिक काळ मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे पंतप्रधानाच्या रेसमध्ये त्यांचे नाव असू शकते. टाईम्स ऑफ इंडियाला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी ही राजकीय भविष्यवाणी वर्तवली. दरम्यान, आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीतल नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाची वारंवार चर्चा करणे किंवा त्याबाबत प्रतिक्रिया करणे निरर्थक असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.