Lok Sabha Elections 2019: टोपी आणि शिटी आणून दिल्यानंतर देशाची चौकीदारी करा, अकबरुद्दीन औवेसी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल
AIMIM Leader Akbaruddin Owaisi (Photo Credits-ANI)

Lok Sabha Electiosns 2019: लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तसेच राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. तर एआयएमआयएम (AIMIM)पक्षाचे अध्यक्ष अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi)यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अकबरुद्दीन औवेसी यांनी एका सभेत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत असे म्हटले की, मोदी नक्की कोण आहेत हे समजण्यापलीकडे आहे. ते कधी चायवाला बनतात तर आता एका दुसऱ्याच रुपात पाहायला दिसून येत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी त्यांनी चौकीदाराचे रुप स्विकारले आहे.

ANI ट्वीट:

नरेंद्री मोदी यांनी चायवाल्याची भुमिका साधून देशाला भुलवले आणि आता चौकीदार म्हणवून घेत असून तेच काम करत आहेत. जेव्हा मोदी चायवाल्याच्या भुमिकेचे रुप घेतले होते. त्यावेळी मी त्यांना चहाची किटली आणि चुल मी देऊ करेन असे औवेसी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत मोदी असे व्यक्ती आहेत जे नाल्यातील गॅसपासून पकोडे बनवतात. मात्र आता मोदी चौकीदार बनले आहेत तर त्यांनी टोपी आणि शिटी देऊन त्यांनी देशाची चौकीदारी करावी असा हल्लाबोल औवेसी यांनी मोदी यांच्यावर केला आहे.