Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 7 टप्प्यामध्ये होणार, पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी तर निकाल 23 मे रोजी लागणार
EC (File Photo)

Lok Sabha Elections 2019 Dates:  निवडणूक आयोगाने आज भारतातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भारतामध्ये 543 जागांवर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये होणार आहे. त्याकरिता आचारसंहिता आजपासून (10 मार्च) लागू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र्रात लोकसभा निवडणुका 4 टप्प्यांमध्ये होणार आहे.  23 मे 2019 दिवशी मतदान मोजणी होणार आहे. Lok Sabha Election 2019 Dates: महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार, पहा एप्रिल महिन्यात कोणत्या चार दिवशी होणार मतदान?

यंदा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या 90 कोटींच्या घरात आहे. 10 लाख मतदारसंघ असणार आहेत. यंदा मतदानाकरिता व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो असेल.लाऊड स्पीकर रात्री दहा नंतर वापरता येणार नाही. सुनील अरोरा यांनी या निवडणुका तारखा निवडताना राजकीय पक्षांशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. यामध्ये परीक्षा, सण आणि इतर महत्त्वाच्या इव्हेण्टचा विचार करण्यात आला आहे.

App द्वारा मतदारांना तक्रार करण्याची सोय खुली करण्यात आली आहे. यामध्ये तक्रार करणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.  सोशल मीडियावरील निवडणूक प्रचारासाठीदेखील खास सर्टिफिकेशन घ्यावं लागणार आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, गुगल आणि युट्युबचा समावेश आहे.सध्याच्या सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019  दिवशी संपणार आहे.