Lok Sabha Election 2019 Maharashtra Dates: निवडणूक आयोगाने आज भारतातील एकूण 543 जागांवर लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशात 7 टप्प्यात निवडणूक होईल. तर महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. 11 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक (Maharashtra Loksabha Election 2019) होतील. त्यासाठीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर निवडणुका होणार आहेत. Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणूक 7 टप्प्यामध्ये होणार, पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी तर निकाल 23 मे रोजी लागणार
महाराष्ट्र्रात कधी होणार लोकसभा निवडणूक 2019?
11 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार
18 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान होणार
23 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान होणार
29 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान होणार
लोकसभा निवडणूक 2019 चे एकूण 7 टप्पे
पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं
देशगभरात लोकसभा मतदान मोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे. सध्याच्या सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019 दिवशी संपणार आहे.